संधी आणि त्याचे प्रकार
उदा:- 'सूर्य उदय झाला' असे न म्हणता 'सूर्योदय' झाला असे म्हणतात.
अशाप्रकारे "जोड शब्द तयार करताना पाहिक्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोघामध्ये वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
- शब्दाची घडण व संधी:-
ईश्वर या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल:-
ईश्वर = ई + श् + व्+ अ + र्+ अ
इच्छा = इ + च + छ +आ
संधीचे प्रकार :-
१. स्वरसंधी :-
"एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने स्वर ने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात."
उदा : कवि + ईश्वर = कवीश्वर
२. व्यंजन संधी:-
"जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात."
उदा:- सत् + जन = (त्+ज्) = सज्जन
चित् + आनंद = (त्+आ) = चिदानंद
३. विसर्ग संधी: -
"एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेंव्हा त्यास 'विसर्ग संधी' असे म्हणतात."
उदा :- तपः + धन = तपोधन = ( विसर्ग + ध् )
दुः + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग + आ )