व्यंजन संधी
जवळ जवळ येणाऱ्या दोन
वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल
तर तेंव्हा व्यंजनसंधी होतो.
नियम १- पहिल्या पाच वर्णापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही
व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच
वर्गातिल पहिले कठोर व्यंजन होऊन संधी होतो.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
विपद + काल
|
द् + क् = त् + क् = त्क
|
विपत्काल
|
वाग + पति
|
ग् + प् = क् + प् = क्प
|
वाक्प्ती
|
वाग + ताडन
|
ग् + त् = क् + त् = त्क
|
वाक्ताडन
|
नियम २- पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज
स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन
संधी होतो याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
वाक + ईश्वरी
|
क् + ई = ग् + ई = गी
|
वागीश्वरी
|
सत + आचार
|
त् + आ = द् + आ = दा
|
सदाचार
|
अप + ज
|
प् + ज् = ब् + ज् = ब्ज
|
अब्ज
|
नियम ३- पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक
आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्यांच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला
अनुनासिक संधी असे म्हणतात
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
वाक + निश्चय
|
क् + न् = ङ + न
|
वाङनिश्चय
|
षट + मास
|
ट + म् = ण + म
|
षण्मास
|
सत + मती
|
त् + म् = न् + म
|
सन्मती
|
नियम ४ – म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो,
व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो.
जसे – सम + आचार = समाचार,
सम + गती = संगती
नियम ५- छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च् हा वर्ण
येतो
जसे – रत्न + छाया =
रत्नच्छाया, शब्द + छल = शब्दच्छल