विसर्गसंधी
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला
वर्ण विसर्ग असतो व त्यापुढील वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेंव्हा विसर्गसंधी
होतो..
नियम १ – विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला असता पुढे मृदू व्यंजन
आल्यास विसर्गाचा उ होऊन अ + उ = ओ असा संधी तयार होतो याला विसर्ग उकार संधी असे
म्हणतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
यश:+ धन
|
श + अ + विसर्ग + धन = श + ओ + धन
|
यशोधन
|
मन:+ रंजन
|
न + अ + विसर्ग + रंजन = न + ओ + रंजन
|
मनोरंजन
|
तेज: + निधी
|
ज + अ + विसर्ग + निधी = ज + ओ + निधी
|
तेजोनिधी
|
नियम २- विसर्गाच्या मागे अ आ व्यतिरिक्त कोणताही स्वर किंवा मृदू
वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो
उदा – नि: + रस = नि + र् +
रस = नीरस, नि : + रव = नि + र् + रव= नीरव
नियम ३- पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन
आल्यास स चा विसर्ग होतो
उदा – मनस् + पटल = मन:पटल,
तेजस् + कण = तेज:कण
नियम ४- पदाच्या शेवटी र् येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र् चा विसर्ग होतो
उदा – अंतर् + करण =
अंत:करण, चतुर + सूत्री = चतु;सूत्री
नियम ५- विसर्गाच्या एवजी येणाऱ्या र् च्या मागे अ व पुढे मृदू
वर्ण आल्यास तो र् तसाच राहून संधी होतो
उदा – पुनर् + जन्म =
पुनर्जन्म, अंतर् + आत्मा = अंतरात्मा
नियम ६ – विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ यापैकी एखादे
व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा – प्रात: + काल = प्रात:काल,
अत: + एव = अतएव
नियम ७- विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क ख प फ यापैकी
कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष होतो
उदा – निष्कर्ष, निष्पन्न,
दुष्कीर्ती आयुष्यक्रम, चतुष्कोन
अपवाद: (दु:+ख= दु:ख, नि:+पक्ष = नि:पक्ष
अपवाद: (दु:+ख= दु:ख, नि:+पक्ष = नि:पक्ष
नियम ८ – विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त थ
आल्यास विसर्गाचा स होतो
उदा – नि:+ चल = निश्चल, नि:+तेज
= निस्तेज
नियम ९- विसर्गाच्या पुढे श स आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप
पावतो
उदा – दु: + शासन = दु:शासन,
नि: + संदेह = नि:संदेह